अखेर सोलापूर रेडझोनमध्ये कोरोनाबाधीतांची संख्या 21 वर, 2 मृत
तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
सोलापुरातील बापूजी नगर, कुबानहुसेन नगर, पाच्छा पेठ, जगनाथ नगर, भद्रावती पेठ येथे नव्याने सहा कोरोनाबाधीत रूग्ण आढळले असून त्यामध्ये 4 पुरूष आणि दोन महिलांचा समावेश आहे. सोलापुरात आता कोरोनाबाधीतांची संख्या 21वर पोहोचली असून त्यापैकी 2 जणांचा मृत्यू झाला आहे. उर्वरित 19 जणांवर सिव्हील हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज सोमवारी दिली.
सोलापूर शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्यामुळे जिल्हाप्रशासनाच्यावतीने 19 एप्रील ते 23 एप्रीलदरम्यान सोलापुरात संपूर्ण संचारबंदी, हद्द बंद करण्यात आली आहे. त्यामुळे सोलापुरातील नागरिकांनी घराबाहेर पडू नये असेहि जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सांगितले. सोलापुरात यापूर्वी कोरोनाबाधीतांची संख्या 15 होती. आता यामध्ये 6 रुग्णांची भर पडली असून आता सोलापुरात 21 कोरोनाबाधीत रूग्णांची संख्या झाली आहे. त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला आहे. नवीन सापडलेले रूग्ण हे तेलंगी पाच्छा पेठ, कुबान हुसेन नगर, जगनाथ नगर, बापूजी नगर, भद्रावती पेठ येथील असून हा पूर्ण पाfरसर सील करण्यात आला असल्याचे शंभरकर यांनी सांगितले.
सोलापुरातील आयसोलेशन वार्डात 778 व्यक्ती होते त्यापैकी 569 जणांचे अहवाल प्राप्त झाला असून, यापैकी 548 जणांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला असून 209 जणांचा अहवाल प्रलंबित आहे, तर 21 व्यक्ती पॉझिटिव्ह आढळले आहेत. सोलापुरात नव्याने सहा कोरोनाबाधित रूग्ण आढळल्यामुळे सोलापुरात घबराटीsचे वातावरण पसरले असून सोलापूर आता रेड झोनमध्ये गेल्याची चर्चा सुरू आहे.
सोलापुकरांनो घरातच बसा, प्रशासनास सहकार्य करा
सोलापुरात गुरूवारपर्यbत संपूर्ण संचारबंदी लागू करण्यात आली असून सर्वांनी याचे पालन करावे. नागाfरकांनी घरातच बसावे. नागाfरकांना अडचण येणार नाहि याची काळजी जिल्हा प्रशासन, महापालिका प्रशासन घेईल. प्रशासनास सहकार्य करा. वेळोवेळी हात धुवा, मास्कचा वापर करा, एकमेकांमध्ये अंतर ठेवा. -मिलिंद शंभरकर, जिल्हाधिकारी