दिवसातून केवळ 6-7 तास काम
केवळ बल्ब बदलण्याच्या कामाकरता एकेठिकाणी 1 कोटी रुपयांचा पगार दिला जात आहे. सोशल मीडियावर सध्या एक जॉब ऑफर चर्चेत आहे. प्रचंड पगार असूनही लोक या नोकरीसाठी अर्ज करत नसल्याचे चित्र आहे. या नोकरीसाठीच्या कामात अत्यंत मोठी जोखीम असल्याने हा प्रकार घडत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल नोकरीच्या या जाहिरातीत टॉवर लॅन्टर्न चेंजर म्हणून कामाचा उल्लेख आहे. अमेरिकेच्या दक्षिण डकोटामध्ये हे काम करावे लागणार आहे. या नोकरीत संबंधिताला 600 मीटरपेक्षा अधिक उंच सिग्नल टॉवरवर चढून त्याचा बल्ब बदलावा लागणार आहे. हा टॉवर सामान्य टॉवसंपेक्षा काहीसा वेगळा असतो. या टॉवरचे वरचे टोक उंचीनुसार निमुळते होत जाते. याच्या टोकावर पोहोचून तेथे बल्ब बदलणे प्रत्यक्षात अत्यंत कठिण कार्य आहे. टॉवरवर चढण्यासाठी सुरक्षेची पूर्ण व्यवस्था कंपनीकडून केली जातेय.
नोकरीसाठी अटी
या नोकरीसाठी सर्वात आवश्यक अट म्हणजेच अर्जदाराला उंचीची भीती असू नये. तसेच तो शारिरीक स्वरुपात पूर्णपणे तंदुरुस्त असावा. एक वर्षापेक्षा कमी अनुभव असलेल्या लोकांनाही या नोकरीकरता अर्ज करता येणार आहे. तर पगार हा अनुभवावर आधारित असेल.
कामाचे स्वरुप
जमिनीपासून 600 मीटर उंचीच्या टॉवरच्या टोकापर्यंत पोहोचण्यास 3 तासांचा कालावधी लागतो. इतकाच वेळ खाली उतरण्यास लागणार आहे. म्हणजेच दिवसातून केवळ 6-7 तासांचे काम असणार आहे. याचबरोबर टॉवरच्या टोकावर 100 किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने वारे वाहत असतात, यामुळे बल्ब बदलण्याचे काम अधिकच आव्हानात्मक ठरते. हे काम करणाऱ्या व्यक्तीला 1 कोटी रुपयांचे वार्षिक पॅकेज मिळणार आहे. दर 6 महिन्यांनी एक किंवा दोनवेळाच एखाद्या टॉवरचा बल्ब बदलावा लागतो. या नोकरीची जाहिरात टिकटॉकवर चर्चेत आली आहे. मोठा पगार असूनही याकरता अर्ज करणाऱ्यांची संख्या खूपच कमी आहे.