मुंबई
विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात या महिन्यात 40 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात 40,710 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. जागतिक अर्थव्यवस्थेला आलेली उभारी लक्षात घेता विदेशी गुंतवणूकदारांचा कल भारतीय बाजारात गुंतवण्याकडे अधिक वाढला असल्याचे दिसून आले आहे.