चिलकलुरिपेट
आंध्रप्रदेशच्या पलनाडु जिल्ह्यात मंगळवारी रात्री उशिरा बस आणि ट्रक यांची जोरदार टक्कर झाली आहे. या रस्ते दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला आहे. टक्कर झाल्यावर बस लागलेल्या आगीत जळून खाक झाली आहे. या दुर्घटनेतील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले.