कामगार सोलापूर जिल्ह्यातील वडशिवणे गावचा
जत/प्रतिनिधी
संख पासून दोन किलोमीटर अंतरावर नाटेकर वस्तीजवळ बंधाऱ्याच्या कामावर मेकॅनिकल मिस्त्री म्हणून काम करत असलेला कामगार रामचंद्र भागवत वाघमारे (वय ३० वर्ष, रा. वडशिवणे ता. करमाळा जिल्हा सोलापूर) याने झाडास गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली.
संख पासून दोन किलोमीटर अंतरावर नाटेकर वस्तीजवळ बंधाऱ्याचे काम सुरू असून सदरचा ठेका आर. एस. हिवरे या ठेकेदाराने घेतला आहे. त्यांच्याकडे वाहन दुरूस्ती करणारा मेकॅनिकल मिस्त्री म्हणून काम करत असलेला कामगार रामचंद्र भागवत वाघमारे याने बंधार्यापासून २०० मीटर अंतरावर असणाऱ्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.
हे ही वाचा : जत शहरात मोटरसायकल-कंटेनर अपघात; १ ठार, २ जखमी
याच्याबरोबर असणारे इतर कामगारांनी त्याला रात्री दहाच्या सुमारास फोनवर बोलताना पाहिले. त्याला जेवणासाठी येण्यास विनंती केली पण तो जेवणासाठी आला नाही. त्याचे लग्न ठरले आहे. दिवाळीनंतर लग्न होणार होते. त्याच्या मोबाईल मध्ये असणाऱ्या एका मुलीशी तो फोनवरती बोलत होता. फोनवरती त्याचं बिनसलं असल्यानं तो रात्री झोपायला आलाच नाही. सकाळी उठून त्याच्याबरोबर असणाऱ्या कामगारांनी त्याचा शोध घेतला असता तो बंदराच्या जवळ असणाऱ्या झाडास लटकलेला दिसला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर उमदी पोलीस ठाण्यास माहिती देण्यात आली. घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह जत ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदनासाठी सायंकाळी आणण्यात आला होता. अधिक तपास उमदी पोलीस करत आहेत.