- एक लाख रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी कारवाई
सावंतवाडी प्रतिनिधी
सावंतवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे यांनी एक लाख रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी रायगड येथील लाचलुचपत विभागाच्या पथकाने त्यांच्यावर कारवाई केली आहे. बिल्डर सिद्धांत परब यांनी याबाबत तक्रार केली होती. सावंतवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लाच घेताना पकडण्यात आल्याने पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. रायगड लाच लुचपत विभागाचे पथक कसून चौकशी करत आहे. खंडागळे यांना ताब्यात घेण्यात आले आहे.