नवी दिल्ली
मारुती सुझुकी आणि टाटा मोटर्सनंतर, ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेडने देखील सर्व वाहनांच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे. वाढती महागाई, वस्तूंच्या किमतीत सातत्याने होणारी वाढ आणि वाढत्या उत्पादन खर्चामुळे दोन्ही वाहन उत्पादकांनी हा निर्णय घेतला आहे. वाढलेल्या किमती 1 जानेवारी 2024 पासून लागू होतील. कंपन्यांनी किमतीच्या वाढीचे प्रमाण जाहीर केले नसले तरी कारच्या मॉडेल्सच्या विविध प्रकारांनुसार किमती वाढतील.