वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारत आणि ओमान यांच्यात ‘आर्काईव्हज’ च्या क्षेत्रात एकमेकांशी सहकार्य करण्याचा करार करण्यात आला आहे. शुक्रवारी या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. भारत आणि ओमान यांच्या संबंधातील जी जुनी आणि महत्वाची कागदपत्रे एकमेकांकडे असतील ती एकमेकांना परत देण्यासाठी हा करार करण्यात आला आहे. या कराराचा प्रारंभ म्हणून भारताने आपल्याकडील ओमानसंबंधीच्या निवडक 70 कागदपत्रांची सूची ओमानला सादर केली आहे. ही कागदपत्रे 1793 ते 1953 या कालखंडतील आहेत. यासमवेत 523 जुन्या कागदपत्रांच्या प्रतीही ओमानच्या आर्काईव्हज विभागाला भारताकडून देण्यात आल्या आहेत.