बेळगाव : आनंदनगर-वडगाव येथील तिसरा क्रॉस येथे चोरट्यांनी पुन्हा घरफोडीचा प्रयत्न केला आहे. यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून या चोरट्यांचा पोलिसांनी बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून आनंदनगर परिसरामध्ये चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडल्या आहेत. चोरट्यांनी अक्षरश: धुमाकूळ घातला होता. घरफोडी करून लाखो रुपयांचा किंमती ऐवज आणि रक्कम चोरली आहे. त्यानंतर काही दिवस हा प्रकार थांबला होता. मात्र सोमवारी रात्री पुन्हा एक घर फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला आहे. आनंदनगर येथील तिसऱ्या क्रॉस येथे असलेल्या घराची खिडकी खुली करून त्यामधून बांबू आत घालण्यात आला. दरवाजाची कडी काढून प्रवेश करण्याचा प्रयत्न सुरू होता. मात्र त्यांचा हा प्रयत्न यशस्वी झाला नाही. यावेळी घरामध्ये काहीजण झोपले होते. त्यांना याचा थांगपत्ता लागला नाही. पहाटे घरातील मंडळी उठल्यानंतर त्यांच्या नजरेला ही घटना निदर्शनास आली. यामुळे पुन्हा चोरीचा प्रयत्न झाल्याचे लक्षात आले. या घटनेनंतर भितीचे वातावरण पसरले असून आनंदनगर परिसरात पोलिसांनी गस्त घालावी. याचबरोबर या चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. सध्या पोलीस निवडणुकीच्या कामामध्ये व्यस्त आहेत. मात्र अशाप्रकारे चोरटे राजरोसपणे घरे फोडण्याचा प्रयत्न करत आहेत. तेंव्हा रात्रीच्यावेळी गस्त घातल्यास साऱ्यांनाच दिलासा मिळणार आहे.
Previous Articleगॅरंटी योजनांमुळे गोरगरिबांना दिलासा
Next Article कडोली ग्रामपंचायतीला डीआयजी पवनकुमार यांची भेट
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.