वृत्तसंस्था/ सॅन दियागो
डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरू झालेल्या सॅन दियागो महिलांच्या खुल्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत ब्रिटनची केटी बोल्टर आणि ऑस्ट्रेलियाची दारिया सेव्हिले यांनी एकेरीत विजयी सलामी दिली.
महिला एकेरीच्या पहिल्या फेरीतील सामन्यात ब्रिटनच्या बोल्टरने युक्रेनच्या सुरेंकोचा 6-3, 6-1 असा 70 मिनिटांच्या कालावधित पराभव करत विजयी सलामी दिली. दुसऱ्या एका सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या सेव्हिलेने 29 वर्षीय झु चा 6-3, 6-3 असा फडशा पाडत दुसऱ्या फेरीत स्थान मिळविले. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी पावसाचा अडथळा आल्याने काही सामने अर्धवट स्थितीत थांबवावे लागले. जर्मनीच्या निमेरीरने फ्रान्सच्या ग्रिचेव्हाचा 6-3, 6-0 असा 54 मिनिटात पराभव करत विजयी सलामी दिली.