कडेगांव प्रतिनिधी
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांचा ‘महाविजय 2024’ च्या अनुषंगाने ‘पश्चिम महाराष्ट्र लोकसभा प्रवास’ सुरु आहे. या पार्श्वभूमीवर सांगली दौऱ्यावर असताना चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी संग्राम (भाऊ) देशमुख यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांचे स्वागत करून सत्कार केला. याप्रसंगी भाजपाचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ तसेच मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष विक्रांतजी पाटील यांचे देखील स्वागत केले.
यावेळी माजी आमदार . पृथ्वीराज देशमुख बाबा, सांगली जिल्हा भाजपा अध्यक्ष निशिकांत दादा भोसले पाटील, सांगली जिल्हा भाजपा उपाध्यक्ष मा. सुरेंद्र चौगुले, कडेगाव नगरपंचायत नगराध्यक्ष धनंजय देशमुख (भैय्या), भाजपा सांगली जिल्हा ओबीसी मोर्चा अध्यक्ष प्रकाश गडळे, कडेगाव तालुका अध्यक्ष अशोक भाऊ साळुंखे, पलूस तालुकाध्यक्ष मिलिंद भैया पाटील, युवा नेते रविराज दादा देशमुख,. विश्वतेज भैय्या देशमुख प्रमुख उपस्थित होते.