वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसामुळे मोठे नुकसान
वार्ताहर/ धामणे
अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे राजहंसगड येथील गंगाधर पवार यांच्या शेतात असलेल्या पवार अॅग्रोफार्मचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये जवळपास साडेचार लाख रुपयाची हानी झाली आहे.
शुक्रवारी दुपारी अचानक वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. यामध्ये शेडचे सर्व पत्रे उडून गेले. तसेच लहान कोंबडीची पिल्ले व कोंबड्या मृत होऊन जवळपास साडेचार लाख रुपयांपर्यंत नुकसान झाले आहे. यामुळे गंगाधर पवार यांचे फार मोठे नुकसान झाले असून, शासनाने याची दखल घेऊन नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.