बेळगाव : आबा व हिंद स्पोर्ट्स क्लब, क्रीडा भरती बेळगावतर्फे यांच्या संयुक्त विद्यमाने पहिल्या पीव्हीआर आंतरराज्य निमंत्रितांच्या जलतरण स्पर्धेला उत्साहात सुरुवात झाली. स्पर्धेचे उद्घाटन नितीन जाधव, सायकलिंग प्रशिक्षक एम. पी. मरणुर, जलतरण प्रशिक्षक विश्वास पवार, आबा क्लबचे अध्यक्ष शितल हुलभते, शुभांगी मंगळूरकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व भारतमाता प्रतिमेचे पूजन करून झाले. यावेळी बेळगावातील नागरिक, जलतरणपटू, पालक व निमंत्रित उपस्थित होते. स्पर्धेत जलतरणपटूंनी उत्कृष्ट कामगिरी करून अनेक विक्रम प्रस्थापित केले. यावेळी श्रीकृष्णानंद कामत, लक्ष्मण पवार, अशोक शिंत्रे, जायंट्स ग्रुपचे अध्यक्ष अविनाश पाटील, उपाध्यक्ष लक्ष्मण शिंदे, विजय बनसुर, मराठा युवक संघाचे अध्यक्ष बाळासाहेब काकतकर, रघुनाथ बांडगी, नेताजी जाधव, माजी क्रिकेटपटू महादेव कंग्राळकर, अजय भाटिया आदी उपस्थित होते.
Previous Articleजागतिक दबावात शेअरबाजार घसरणीसोबत बंद
Next Article केएलएस, ज्ञानप्रबोधनी संघांची विजयी सलामी
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.