वृत्तसंस्था/ गुरुग्राम
शनिवारी येथे झालेल्या आयटीएफ महिलांच्या टेनिस स्पर्धेत भारताच्या अंकिता रैनाने कझाकस्तानची साथिदार झिबेक कुलेमबाएव्हा समवेत दुहेरीचे अजिंक्यपद पटकाविले. मात्र या स्पर्धेत अंकिताला एकेरीच्या उपांत्य फेरीतच पराभूत व्हावे लागले.
महिला दुहेरीच्या अंतिम सामन्यात अंकिता रैना आणि कुलेमबाएव्हा यांनी जॅक्वेलेनी अवाद व जस्टिना मिकुलस्कायटी यांचा 6-4, 6-2 अशा सरळ सेट्समध्ये पराभव केला. मात्र महिला एकेरीच्या उपांत्य सामन्यात कोरीयाच्या कू ने अंकिता रैनाचा 7-6 (7-4), 6-3 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. लिथूनियाच्या मिकुलस्कायटीने स्लोव्हेनियाच्या डेलीला जेकुपोव्हीकचा 6-4, 2-6, 7-6 (7-0) असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला.