बेंगळूर : कन्नड चित्रपट क्षेत्रातील प्रसिद्ध निर्माता सौंदर्य जगदीश यांनी रविवारी सकाळी महालक्ष्मी लेआउटमध्ये आत्महत्या केली आहे. आर्थिक कारणामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. राजाजीनगरच्या सुगुण रुग्णालयात मृतदेह ठेवण्यात आला आहे. सौंदर्य जगदीश यांनी गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न केला असता त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना तातडीने स्थानिक सुगुण ऊग्णालयात दाखल केले. मात्र, तत्पूर्वी त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांनी अप्पू-पप्पू, स्नेहितरू यांसारख्या अनेक चित्रपटांची निर्मिती केली होती. बेंगळूरमधील जेटलॉग पबचे मालक असलेले जगदीश बिल्डरही होते.
Previous Articleइस्रायलवर एअर स्ट्राईक, अमेरिकेला धमकी
Next Article सर्वच पक्षांच्या अग्निपरीक्षेचा प्रथम टप्पा
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.