ऑनलाईन टीम/तरुण भारत
प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला (sidhu moose wala) यांची मानसा जिल्ह्यातील जवाहरके गावात रविवारी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. त्याच्या हत्या प्रकरणात दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने तिहार जेलमधून गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईला (Lawrence Bishnoi) ताब्यात घेतले आहे. दिल्ली पोलिसांचे (Delhi Police) विशेष पथकाने बिश्नोईकडे मुसेवाला हत्याकांड प्रकरणात चौकशी करणार आहे. या सोबत काला जठेडी आणि काला राणाच्या खून प्रकरणी त्याच्याकडे चौकशी होण्याची शक्यता सूत्रांनी दिली आहे. ५ दिवसांसाठी गँगस्टर बिश्नोईचा ताबा पोलिसांनी गेतला आहे.
तिहार जेलमध्ये बंद असलेल्या गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईला (Lawrence Bishnoi) दिल्ली पोलिसांच्या स्पशल सेलने रिमांडवर घेतले आहे. बिष्णोईला कोर्टामार्फत अन्य एका प्रकरणात 5 दिवसांच्या रिमांडवर घेण्यात आले होते. मात्र, आता सिद्धू प्रकरणात त्याची चौकशी केली जाणार आहे.
कॅनडास्थित गोल्डी ब्ररारने मुसेवालाच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. यानंतर तिहारमध्ये लॉरेन्सची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. याबाबत सूत्रानी माहिती दिली आहे. पंजाब पोलिसांनी त्याला ताब्यात घेण्यापासून रोखण्यासाठी लॉरेन्स बिश्नोईच्या (Lawrence Bishnoi) वतीने न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.
पंजाबमधील भगवंत मान (bhagwant mann) सरकारने शनिवारी दि. २८ मे रोजी मूसेवाला यांची व्हीआयपी सुरक्षा काढून घेतली होती. त्यांनतर लगेच एक दिवसानंतर म्हणजेच अज्ञात वक्तींनी हल्ला केला. हल्ला झाल्यानंतर मूसेवाला यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.