पुणे / प्रतिनिधी :
Hindu Federation challenges Aryan Khan’s acquittal क्रूझवरील अंमली पदार्थ प्रकरणात अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानच्या झालेल्या निर्दोष मुक्ततेला हिंदू महासंघाकडून उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आले आहे. हिंदू महासंघाचे संस्थापक आनंद दवे, ऍड. सुबोध पाठक (पालघर) यांनी पत्रकार परिषदेत यासंदर्भात माहिती दिली.
याबाबत बोलताना दवे म्हणाले, घटनास्थळी रंगेहाथ पकडले गेलेल्या, गुन्हा मान्य असल्याचे तपास अधिकाऱ्यांपुढे मान्य केलेल्या आणि त्याच आधारावर खालच्या न्यायालयाने 2 वेळा जामीन नाकारल्या गेलेल्या आर्यन खान आणि त्याच्या सहकाऱ्यांना तपास यंत्रणांनी आपल्या अधिकार क्षेत्राबाहेर जाऊन निर्दोष मुक्त केले. या संपूर्ण घटने विरोधात हिंदू महासंघाने कोर्टात आव्हान दिले असून, या संपूर्ण प्रक्रियेत तपास यंत्रणा किती गाफिल राहिल्या, त्यांनी कसे त्यांच्या अधिकार क्षेत्राबाहेर जाऊन या सर्व आरोपींना मदत केली, हे मुद्दे उपस्थित केले. याची पूर्ण 36 पानांची कागदपत्रे कोर्टात सादर केली आहेत, असे त्यांनी सांगितले.
अधिक वाचा : MPSC कडून सर्वसाधारण गुणवत्तायादी जाहीर