वार्ताहर/ कुडाळ
तालुक्यातील तेंडोली येथील श्री देवी अनलादेवीचा वार्षिक जत्रोत्सव 28 नोव्हेंबर रोजी होणार आहे.सकाळपासून ओटी भरण्याचा कार्यक्रम, रात्री 9.30 वाजता पुराण वाचन, 10 वाजता पालखी सोहळा, 12 वाजता मामा मोचेमाडकर दशावतार मंडळाचे नाटक होणार आहे. भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अनलादेवी ग्रामस्थ मंडळाने केले आहे.