पाणबुडीविरोधी युद्धपद्धतीची नौका
मालवण -:
मालवणात भारतीय नौसेना दिनाची उत्कंठा शिगेला पोहोचली असताना या कार्यक्रमाआधी ‘मालवण’ नावाच्या युद्धनौकेचे कोचीन येथे जलावतरण झाले आहे. ही पाणबुडीविरोधी युद्धपद्धतीची युद्धनौका आहे. ‘मालवण’चे जलावतरण दक्षिण नौदल कमांडचे प्रमुख व्हाईस ॲडमिरल सूरज बेरी यांच्या पत्नी कंगना बेरी यांच्या हस्ते करण्यात आले.