बेळगाव: आज बेळगाव शहरामध्ये लोकायुक्त अधिकाऱ्यांनी कारवाई केली असून पंचायत राज विभागाचे सहाय्यक कार्यकारी अभियंता एम एस बिरादार यांच्या घरावर छापेमारी केली आहे.
विश्वेश्वरय्यानगर येथील श्रद्धा अपार्टमेंटमधल्या त्यांच्या फ्लॅटवर धाड टाकली असून लोकायुक्त एसपी हनुमंतराय यांच्या नेतृत्वाखाली पथकाकडून महत्वाच्या कागदपत्रांची पडताळणी केली जात आहे.