प्रतिनिधी/ बेळगाव
हुबळी-धारवाड महानगरपालिकेतील काँग्रेस नगरसेवक निरंजन हिरेमठ यांच्या मुलीच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर महिला आणि बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. झालेल्या घटनेबद्दल दु:ख व्यक्त करून कुटुंबीयांना सावरण्याचा सल्ला दिला. यावेळी हुबळी पोलीस आयुक्त रेणुका शशिकुमार, काँग्रेस नेते रजत उळ्ळाग•ाrमठ, मनपाविरोधी गटपक्ष नेत्या सुवर्णा कलकुंटली, मोहन लिंबीकाई, बंगारेश हिरेमठ, राजशेखर मेणशीनकाई आदी उपस्थित होते.