बेळगाव : शहरात अडथळा ठरत असलेल्या झाडांच्या फांद्या मनपाने रविवारी हटविल्या आहेत. अडथळा ठरत असलेली झाडे आणि फांद्या छाटणीचे काम हाती घेण्यात आले. कचेरी रोड व इतर ठिकाणी वाहतुकीला अडथळा ठरत असलेली झाडे आणि फांद्याही तोडण्यात आल्या आहेत. शहरात बाजारपेठेसह इतर ठिकाणी झाडे आणि फांद्या व्यावसायिकांना व वाहतुकीला अडथळा ठरत होती. दरम्यान व्यावसायिकांनी झाडे आणि फांद्या हटवाव्यात, अशी मागणी केली होती. यानुसार मनपाने अडथळा ठरत असलेली झाडे आणि फांद्या हटविल्या आहेत. काही आयुर्मान संपलेली झाडे धोकादायक स्थितीत आहेत. अशी झाडे प्रथमत: तोडण्यात आली आहेत. त्याचबरोबर पथदीपांचा प्रकाश रोखणाऱ्या झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यात आली आहे. त्यामुळे परिसरालाही मोकळा श्वास मिळाला आहे.
Previous Articleविकासामुळेच भाजप-निजद कार्यकर्ते काँग्रेसमध्ये
Next Article समाज निर्मितीत प्रत्येकाने हातभार लावावा
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.