पाडळी खुर्दच्या निलम अमित कांबळेंकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे राजिनामा सादर, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनाही पाठविली राजीनाम्याची प्रत; जिह्यातील पहिलेच पाऊल
कोल्हापूर प्रतिनिधी
सरकारने मराठा समाजाला सर्व बाजूनी टिकणारे व कायमचे मराठा आरक्षण द्यावे, तसेच मराठा आरक्षणासाठी असलेल्या आंदोलनाच्या पाठींबा म्हणून पाडळी खुर्द (ता. करवीर) येथील माजी उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्या निलम अमित कांबळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे सादर केला आहे. राजीनाम्याची प्रत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही पाठविली आहे. त्यांच्या या भूमिकेचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.
मराठा आरक्षणासाठी सध्या राज्यभर सुऊ असलेल्या आंदोलनाला माझा व माझ्या समाजाचा पाठींबा आहे. मराठा समाज एके काळी 10 एकराचा मालक होता तो आज भावा-भावांची वाटणी होऊन 10 गुंठ्यावर आला आहे. त्यामुळे समाजाचा आर्थिकस्तर कमी झाला आहे. याचा विचार करता मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज असून ते मिळालेच पाहीजे, अशी माझी व माझ्या समाजाची धारणा आहे.तरी कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता सर्व बाजूनी टिकणारे व कायमचे आरक्षण मराठा समाजाला द्यावे. तसेच मराठा समाजाप्रती असण्राया माझ्या व माझ्या समाजाच्यावतीने कृतज्ञ होण्यासाठी व आमचे कर्तव्य म्हणून मी माझ्या ग्रामपंचायत सदस्य पदाचा राजीनामा देत आहे, असे या राजीनाम्यामध्ये ग्रा.प.सदस्या निलम कांबळे यांनी म्हंटले आहे.