सांगली प्रतिनिधी.
उदयपूर- म्हैसूर हमसफर ही सुपरफास्ट गाडी सांगलीत थांबण्यास सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी १०० पेक्षा जास्त प्रवासी या गाडीतून सांगली रेल्वे स्टेशनवर उतरले. पॅलेस क्वीन गाडीने सांगलीकरांचे मन जिंकले. नागरिक जागृती मंच आणि व्यापारी वर्गाच्या वतीने नवीन गाडीचे सांगली रेल्वे स्टेशन येथे स्वागत करण्यात आले. पुण्याहून सुटल्यानंतर ही गाडी थेट सांगलीला थांबणार आहे. गाडीचे ड्रायव्हर व स्टेशन मॅनेजर विवेक पोदार यांचा फुल, हळद बेदाणा, भडंग देऊन सत्कार करण्यात आला.
सांगलीतून बेंगलोर मैसूर हुबळी
उदयपुर, चित्तोडगड
सुरत, बडोदा येथे जाणाऱ्या लोकांना ही गाडी सोयीची आहे.
एकूण २० डब्बे असलेले पॅलेस क्वीन गाडी २ जनरल डब्बे
१६ एसी स्लिपर डब्बे
१ स्लीपर डब्बा
१ पॅन्टरी(किचन) डब्बा आहे. सांगली स्टेशन वरुन येणाऱ्या जाणाऱ्या प्रवासासाठी पॅलेस क्वीन गाडीत सुमारे ४०० सिट उप्लब्ध. रेल्वे गाडी नं १९६६७ पॅलेस क्वीन उदयपूर-मैसूर हमसफर एक्सप्रेस ला मंगळवार ११ एप्रिल पासून सांगली रेलवे-स्टेशन वर थांबा देण्यात आला आहे. ही गाडी प्रत्येक सोमवारी रात्री ९ वाजता उदयपुर येथून निघून मंगळवारी रात्री १०:३० वाजता सांगली स्टेशन वर थांबेल.उदयपुर ते सांगली दरम्यान चितोडगड, मंदसौर, रतलाम, बडोदा, सुरत, मुंबई(वसई रोड), पुणे येथे थांबेल. सांगली रेल्वे स्टेशन वरून निघून ही गाडी सांगलीतून बेळगाव, हुबळी, दावणगिरी येथे थांबून बुधवारी दुपारी १:३० वाजता बेंगलोर सिटी पोहोचल. तिथून पुढे मंड्या येथे थांबून मैसूर ला बुधवारी दुपारी ३:४८ वाजता पोहोचेल.परत येताना गाडी नं १९६६८ पॅलेस क्वीन मैसूर-उदयपूर हमसफर एक्सप्रेस ला शुक्रवार १४ एप्रिल पासून पहाटे २:३० वाजता सांगली स्टेशन वर थांबा देण्यात आला आहे. ही गाडी प्रत्येक गुरूवारी सकाळी १० वाजता मैसूर येथून निघून बेंगलोर सिटी येथे गुरुवारी दुपारी १२:१० वाजता येईल. बेंगलोर येथून निघून दावणगिरी, हुबळी, बेळगाव येथे थांबून शुक्रवार पहाटे २:३० वाजता सांगली रेल्वे स्टेशनवर थांबेल.
सांगलीतून निघून शुक्रवार सकाळी ८ वाजता पुणे, १२:२७ वाजता मुंबई (वसई रोड), दुपारी ३:२३ सुरत, ५:१३ बडोदा व तिथून रतलाम, मंदसौर व चितोडगड थांबून शनिवार पहाटे २:५० वा उदयपुर पोहोचेल.