मालवण -:
नौसेना दिनासाठी मालवण दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी राजकोट किल्ला येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केले. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नारायण राणे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, पालकमंत्री रवींद्र चव्हाण आदी उपस्थित होते.