प्रतिनिधी,सरवडे
राधानगरी तालुका संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्तारूढ गटाच्या विठ्ठलराव खोराटे, वसंतराव पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहु विकास आघाडीने १५ जागेवर निर्विवाद वर्चस्व मिळविले. विरोधी शरद पाडळकर व शुभांगी खोराटे यांच्या शिवशंकर परिवर्तन आघाडीचा पराभव झाला.
संघाच्या स्थापनेपासून प्रथमच निवडणूक लागल्याने या निवडणूक निकालाकडे तालुक्याचे लक्ष लागले होते. निवडणुकीसाठी १५ जागेसाठी २५ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात होते.संघाच्या ५८६५ व्यक्ती सभासदापैकी ३७७३ सभासदानी मतदानाचा हक्क बजावला होता.तर संस्था गटासाठी १०५ पैकी १०५ मतदाराने हक्क बजावला.आज सकाळी दहा वाजता संस्था गटाचा पहिला निकाल जाहीर झाला. यामध्ये राजर्षी शाहु आघाडीचे वसंतराव पाटील ९२ मताने, विठ्ठलराव खोराटे ८९, बंडा पाटील ६७ मते मिळवून विजयी झाले.
अन्य विजयी उमेदवार व मते अशी- व्यक्ती सर्वसाधारण प्रतिनिधी गट- विलास एरूडकर (३१४२),शिवराज खोराटे ((३१६८)राजाराम देवर्डेकर (३१३६)जालंधर पाटील(३१११), शुभम पाटील(३११२), सर्जेराव बुगडे(३१०१)श्रीकांत साळोखे(३०५७) महिला प्रतिनिधी- आनंदी पाटील(३२१२),वैशाली पाटील(३१७३)
इतर मागास प्रवर्ग – लहु गुरव(३१६८)
अनुसूचित जाती/जमाती प्रतिनिधी- मधुकर कांबळे (३२१०)
विमुक्त,भटक्या जमाती- प्रतिनिधी दत्तात्रय धनगर (३१७८) हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून युसुफ शेख यांनी काम पाहिले.
निवडणूक निकाल्यानंतर विजयी उमेदवारासह सर्व समर्थकांनी जल्लोष साजरा केला.तर राधानगरी, कंथेवाडी, सरवडे परिसरात विजयी मिरवणूक काढली. संघाचा कारभार पारदर्शी असल्याने सभासदांनी आमच्या कारभारावर विश्वास ठेवून सर्व आघाडीला मोठ्या मताधिक्याने निवडून दिले आहे. तर व्यक्तिगत द्वेशातून संघाची निवडणूक लादणाऱ्यांना सभासदांनी त्यांची जागा दाखवून दिली आहे अशी प्रतिक्रिया आघाडी प्रमुख विठ्ठलराव खोराटे यांनी दिली.
Abhijeet Khandekar
Meet Abhijeet Khandekar : a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. With a Master's degree in Journalism from Shivaji University, Abhijeet specializes in political news, entertainment, and local content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives. Connect with Abhijeet for collaborations and captivating content that informs and entertains.