मुंबई :
पुढील महिन्यात भारतात आयसीसी वनडे विश्वचषक स्पर्धा होणार आहे. यासाठी बीसीसीआयने विशेष पुढाकार घेतला असून भारतातील आयकॉन्सना खास तिकिटे देण्याची योजना आखली आहे. त्याला ‘गोल्डन तिकीट फॉर इंडिया आयकॉन्स‘ असे नाव देण्यात आले आहे. या अंतर्गत दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांना पहिले गोल्डन तिकीट देण्यात आले. यानंतर क्रिकेटचा देव मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरलाही हे तिकीट देण्यात आले. बीसीसीआयने शुक्रवारी ट्वीटरवर पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये सचिनसोबत जय शाह दिसत आहे. जय शहा यांनी सचिनला गोल्डन तिकीट दिले आहे.