गेल्या अनेक महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यभर चर्चेत आहे. दरम्यान संभाजीराजे छत्रपती व मराठा समाजाचे शिष्टमंडळ आज दिल्लीत केंद्रीय मागासवर्ग आयोगाची भेट घेणार आहेत.
गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी हालचालींना वेग दिसून येत आहे. यातच आरक्षणासाठी संभाजीराजे छत्रपती देखील पुढे सरसावले आहेत. आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया संभाजीराजेंना माहिती असल्याने ते मंगळवारी दिल्लीत दाखल झाले आहेत. दिल्लीत आज दुपारी ३ वाजता केंद्रीय मागासवर्ग अयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांची भेट छत्रपती संभाजीराजे व मराठा समाजाचे शिष्टमंडळ घेणार आहे.
काही दिवसांपूर्वीच संभाजीराजे छत्रपती यांनी महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाची भेट घेतली होती. तसेच, मराठा समाजाला न्याय मिळावा, यासाठी सर्वस्तरावर संभाजीराजे छत्रपती प्रयत्न करत आहेत.