क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
टिळकवाडी येथील सुभाषचंद्र बोस लेले मैदानावर सार्वजनिक शिक्षण खात्याच्या माध्यमिक मुला-मुलींच्या फुटबॉल स्पर्धेत मुलींच्या गटात संत मीरा व बैलहोंगल तर मुलांच्या गटात सेंट पॉल्स, सर्वोदय खानापूर यांनी अंतिम फेरीत प्रवेश केला.
स्पर्धेच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा शिक्षणाधिकारी बसवराज नलतवाड, बेळगाव शहर गटशिक्षणाधिकारी रवी बजंत्री, जिल्हा शारीरिक शिक्षण अधिकारी डी एस डिग्रेज, शहराच्या पीईओ जहिदा पटेल, बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटना सचिव अमित पाटील, आनंद चव्हाण, विवेक पाटील, आर पी वंटगुडी, संजीव बडगेर, एल बी नाईक, उमेश कुलकर्णी, बापू देसाई, जी. बी. पटेल, जयसिंग धनाजी, उमेश मजुकर, स्पर्धा आयोजक सी. आर. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी उमेश कुलकर्णी यांनी उपस्थित पाहुण्यांचा परिचय करून दिला तर बापू देसाई, जयसिंग धनाजी, एचव्ही रोगी, अल्लाबक्ष बेपारी यांनी उपस्थित पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यानंतर बसवराज नलतवाड, रवी बजंत्री यांनी खेळाडूंना मार्गदर्शनपर भाषणे केली. यानंतर या पाहुण्यांनी श्रीफळ वाढविले, फुटबॉलला किक मारून स्पर्धेचे उद्घाटन केले.
याप्रसंगी पंच योगेश सागांवकर, शशांक बोळगुंडी, अमाशी, यरगट्टी व विविध तालुक्मयातील क्रीडा शिक्षक, शिक्षक उपस्थित होते.