काँग्रेसचे खंदे समर्थक हरपले ; शिक्षणमंत्री ,माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांचे निकटवर्तीय
सावंतवाडी । प्रतिनिधी
तळकटचे (ता. दोडामार्ग )माजी सरपंच शिवाजी सावंत यांचे गोवा -बांबुळी येथे रविवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन ,मुलगे ,सुना नातवंडे, बहीण, चुलत भाऊ, पुतणे असा मोठा परिवार आहे . शिवाजी सावंत काँग्रेसचे खंदे समर्थक होते .शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुरेश दळवी यांचे ते निकटवर्तीय होते. सावंतवाडीतील माजगाव शिरोडा नाकाजवळील चारचाकी गॅरेजचे मालक निलेश सावंत यांचे ते वडील तर तळकटचे विद्यमान सरपंच सुरेंद्र सावंत यांचे ते चुलते होत.