वारणानगर / प्रतिनिधी
कोडोली सह परिसरात चिकन गुनिया,डेंग्यू ची साथ पसरली असून उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी यांच्या मनमानी कारभारामुळे जनतेला त्रास होत आहे याचा जाब विचारत आज गुरुवार दि.६ रोजी शिवसैनिकांनी निदर्शने केली.
उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनिल अभिवंत वेळेत हजर राहत नाहीत याचा फायदा घेत इतर अधिकारी कर्मचारी देखील वेळेत नसतात. कामावर हजर असलेबाबत मस्टरवर देखील कोणाच्या सह्या नाहीत. यांचा निष्काळजीपणा गोरगरीब जनतेला त्रासाचा ठरत असल्याचा आरोप शिवसैनिकांनी करीत निदर्शने केली.
ग्रामविकास अधिकारी जयवंत चव्हाण, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विभाग प्रमुख संजय निकम, शिवसहकार सेना उप जिल्हा प्रमुख वीरेंद्र पाटील, उपविभाग प्रमुख अंकुश रोकडे, गट प्रमुख विजय किरुळे,राजवर्धन पाटील यासह सशिवसैनिक उपस्थित होते.