► गांधीनगर
गुजरात विधानसभेत घोषणाबाजी केल्याप्रकरणी 10 काँग्रेस आमदारांना एक दिवसासाठी निलंबित करण्यात आले आहे. गुजरात विधानसभेचे सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून यावेळी काँग्रेस आमदारांनी अनेक मुद्द्यांवरून गोंधळ घातला आहे. यामुळे विधानसभा अध्यक्षांनी 10 काँग्रेस आमदारांना एक दिवसासाठी निलंबित करण्याची कारवाई केली आहे. विधानसभेत काँग्रेसचे एकूण 15 आमदार असून गोंधळावेळी यातील 5 आमदार अनुपस्थित होते.