करमाळा प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आरोग्यमंत्री प्रा. तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली परंडा येथे २७ नोव्हेंबर रोजी भव्य आरोग्य शिबिराचे नियोजन करण्यात आले असून या किमान दोन लाख रुग्णांची तपासणी करणार असल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रा शिवाजीराव सावंत यांनी दिली आहे.
या पत्रकार परिषदेसाठी जिल्हाप्रमुख अमोल शिंदे ,महेश चिवटे, मनीष निकाळजे ,शहर प्रमुख मनोज शेजवळ, जिल्हा उपप्रमुख दत्तात्रय सावंत,युवा सेनेचे जिल्हाप्रमुख साठे करमाळा उपशहर प्रमुख नागेश गुरव, उपजिल्हाप्रमुख चौगुले हरिभाऊ चौगुले, तालुकाप्रमुख मस्के उपस्थित होते.
सोलापूर येथील विश्रामगृहावर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना प्रा शिवाजीराव सावंत म्हणाले की “माता सुरक्षित घर सुरक्षित” या योजनेअंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात तीन कोटी महिलांची तपासणी झाली असून या उपक्रमाला संपूर्ण महाराष्ट्रातील उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा तानाजी सावंत यांनी महाराष्ट्रात उपक्रमाचा आता इतर राज्यात राबवला जात आहे.
आता एक नवीन ध्येय घेऊन परांडा येथे महाराष्ट्र शासनाच्या वतीने आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या ठिकाणी जवळपास 500 तज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून रुग्णांची तपासणी केली जाणार आहे. सोलापूर धाराशिव, लातूर ,अहमदनगर या जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर योजनेचा फायदा घेऊ शकणार आहेत .या शिबिरात जवळपास दोनशे प्रकारच्या तपासण्या सर्व रुग्णांच्या मोफत करण्यात येणार असून त्यात निष्पन्न होणाऱ्या आजारावर शस्त्रक्रिया करण्याची वेळ आली, तर ती महाराष्ट्र शासनापासून मोफत करून देण्याची तयारी करण्यात आली आहे. चष्मे वाटप मोफत अपंगांना दिव्यांगांना साहित्य वाटप आदी उपक्रम घेण्यात येणार असून आहे.
या आरोग्य शरीराचे नियोजन करण्यासाठी चार जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी कामाला लागले असून गावोगावी आरोग्य शिबिराचा प्रचार व नाव नोंदणी सुरू आहे.
यापूर्वी अशा प्रकारचे शिबिर गुजरात मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थिती देण्यात आले होते. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात ही पहिली शिबीर होत असून हे शिबिर यशस्वी करण्यासाठी सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी काम करावे असे आवाहन केले.या बैठकीत जवळपास सोलापूर शहरातील 200 महिलांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला.