बेळगाव : मिरज-लोंढा रेल्वेमार्गाचे दुपदरीकरण केले जात असून, यातील एक टप्पा असणाऱया देसूर-खानापूर रेल्वेमार्गाचे दुपदरीकरणाचे काम नुकतेच पूर्ण झाले. नव्याने केलेल्या रेल्वेमार्गाची स्पीड ट्रायल घेण्यात आली. ताशी 120 कि. मी. वेगाने ही चाचणी घेण्यात आली.
देसूर ते खानापूर या 15 कि. मी. रेल्वेमार्गाचे दुपदरीकरण पूर्ण झाले. त्यानंतर या मार्गाची स्पीड ट्रायल व पाहणी बुधवार दि. 28 रोजी करण्यात आली. नैर्त्रुत्य रेल्वेचे सुरक्षा विभागाचे आयुक्त अभयकुमार राय यांच्या उपस्थितीत रेल्वेमार्गाची पाहणी झाली. अधिकारी वर्गाने ट्रॉलीमध्ये बसून 15 कि. मी. मार्गाचे परीक्षण केले. यावेळी नैर्त्रुत्य रेल्वेच्या हुबळी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.