वृत्तसंस्था/ चेन्नई
येथे सुरू असलेल्या एटीपी चेन्नई ओपन चॅलेंजर स्पर्धेत बुधवारी भारतीय खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. द्वितीय मानांकित सुमित नागलने आपल्याच देशाच्या प्रज्वल देवचा सहज पराभव करून उपउपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले.
प्रज्वलपेक्षा तब्बल 350 क्रमांकाने पुढे असणाऱ्या सुमित नागलने हा सामना 6-1, 6-2 असा पराभव केला. सुमितने या लढतीत पूर्ण वर्चस्व राखले होते. अन्य एका सामन्यात शशीकुमारने सुमारे अडीच तास चाललेल्या मॅरेथॉन लढतीत पोलंडच्या मॅक्स कॅसनिकोवस्कीवर 6-3, 4-6, 7-5 अशी मात केली. रामकुमार रामनाथनला मात्र स्पेनच्या रोका बटालाकडून 6-7 (3-7), 2-6 असा पराभव पत्करावा लागला. ऑस्ट्रेलियाच्या बर्नार्ड टॉमिकने पहिली फेरी जिंकताना एका सेटची पिछाडी भरून काढत पोलंडच्या ओलफ पीझकोवस्कीवर 2-6, 6-4, 7-6 (7-2) अशी मात केली.