जीवनाच्या सुराचे भावपूर्ण सादरीकरण दाखविणाऱ्या ‘अमलताश’ या चित्रपटाचा रंजक ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. सुहास देसले यांचे लेखन अन् दिग्दर्शन लाभलेल्या या चित्रपटात राहुल देशपाडे, पल्लवी परांजपे, प्रतिभा पाध्ये, दीप्ति माटे, त्रिशा कुंटे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट म्हणजे प्रेक्षकांना एक संगीत मेजवानीच असेल. बहिण आणि भाचीसोबत राहणाऱ्या नायकाच्या आयुष्यात एक परदेशी युवती आल्याचे दाखविण्यात आले. संगीतप्रेमी नायकाचे कॅनेडियन युवतीशी सूर जुळणार का आणि हे संगीत त्यांना आयुष्याच्या कोणत्या वळणावर नेणार हे चित्रपट पाहिल्यावरच कळेल. राहुल यांनी यात नायकाची भूमिका साकारली आहे. चित्रपटातील सर्व कलाकार हे मूळात संगीतकार आहेत. सर्व गाणीही थेट सेटवर रेकॉर्ड करण्यात आली आहेत. आपल्या आपल्या प्रामाणिक भावना संगीतातून व्यक्त करू शकतो. त्यामुळे शक्य होईल तितकं संगीत व्यक्त करणे हा यामागील विचार होता, असे सुहास देसले यांनी म्हटले आहे. चित्रपटाचे चित्रिकरण पुण्यात झाले आहे. अमलताश वर्षातून एकदाच फुलतो, आपलं जीवन समृद्ध करतो आणि आनंदी निरोप देतो. हा चित्रपट प्रत्येकासाठी असाच ठरेल अशी आशा असल्याचे दिग्दर्शकाने म्हटले आहे. हा चित्रपट 8 मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Previous Articleचीनमधील पुरुषांना मेकअपचे वेड
Next Article हल्दानी हिंसेप्रकरणी अब्दुल मोईदला अटक
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.