कराड /प्रतिनिधी
सोमवारी पहाटे पाच ते सहा च्या दरम्यान मुंबईवरून पॅसेंजर भरून कोल्हापूरला जात असणारी ट्रॅव्हल्स डिवायडरला धडकली. चालकाचा ताबा सुटल्याने बस पलटी होऊन पंधरा ते वीस फूट अंतरावर फरफटत गेली. हा अपघात कराड तालुक्यातील गोटे गावच्या हद्दीत घडला आहे.
या बसमध्ये बावीस पॅसेंजर होते यामधील आठ जण जखमी झाले आहेत.अपघातातील जखमी हे कोल्हापूर,चिपळूण,मुंबई या परिसरातील आहेत.त्यांना अँब्युलन्समधून कराड येथे तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
गोटे गावच्या हद्दीत हॉटेल महिंद्रा समोर अपघात झाला असल्याची माहिती मिळताच हायवे हेल्पलाइन पेट्रोलिंग इन्चार्ज दस्तगीर आगा महेश होवाळ व पथक तसेच शहर पोलिस स्टेशनचे खालीक ईनामदार, महामार्ग पोलीस ठाण्याचे लोखंडे यांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्तांना तात्काळ मदत केली तसेच महामार्गावरील विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत केली.