बेळगाव : किल्ला आवारातील दुर्गादेवी मंदिर येथे जिल्हा स्वीप समितीतर्फे मतदान जागृती फेरी काढण्यात आली. जिल्हा स्वीप समितीचे अध्यक्ष, जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी हिरवे निशाण दाखवून फेरीला चालना दिली. यावेळी नागरिकांना गुलाबपुष्प वाटून सक्तीने मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी स्वीप समितीचे अध्यक्ष राहुल शिंदे म्हणाले, लोकसभा निवडणुकांमध्ये सर्वांनी न चुकता मतदान करावे. त्या माध्यमातून मतदानाचा टक्का 100 टक्के व्हावा यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. या मतदान जागृती फेरीमध्ये संगोळ्ळी रायण्णा बीएड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांनी मतदारांना गुलाबपुष्प देऊन मतदान करण्यासाठी आवाहन केले. किल्ला येथील दुर्गादेवी मंदिर येथून मतदान जागृती फेरीला प्रारंभ करण्यात आला. यानंतर मुख्य बसस्थानक, खडेबाजार, शनिवार खूट, काकतीवेसमार्गे चन्नम्मा चौकातून कन्नड साहित्य भवन येथे फेरीची सांगता करण्यात आली. या फेरीमध्ये संगोळ्ळी रायण्णा शिक्षण महाविद्यालयाच्या 200 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. जिल्हा पंचायत कर्मचारी, अधिकारी आदी उपस्थित होते. याप्रसंगी निवासी जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी, जिल्हा पंचायत स्वीप समिती नोडल अधिकारी डॉ. एम. कृष्णराजू, योजना अधिकारी गंगाधर दिवटर, शंकरानंद बनशंकरी, लेखाधिकारी गंगा हिरेमठ आदी उपस्थित होते.
Previous Articleऑनलाईन सेवा सुरू; मात्र समस्यांनी जनता त्रस्त
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.