जिथे जातात तिथे यश घेऊन येतात | राणेंनी केली स्तुती
नौसेना दिनाच्या संध्येला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मालवणात आपल्या भाषणातून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले.आम्हाला आमच्या पंतप्रधानांचा अभिमान आहे. असे, प्रतिपादन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी येथे केले. पंतप्रधान जेथे जातात तिथे यश घेऊन येतात. त्यामुळे आम्हाला त्यांचा प्राऊड आहे. अशा शब्दात नारायण राणेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची स्तुती केली. नुकत्याच पार पडलेल्या देशातील तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे यश हे नऊ वर्षातल्या कामाचे यश आहे हे त्यांनी दाखवून दिले असेही ते म्हणाले.