सौंदत्ती तालुक्यातील गोरवनकोळ्ळ – वटनाळ गावानजीकच्या मलप्रभानदीच्या बॅकवॉटरमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळून आला आहे.
मृत महिला धारवाड शहरातील सप्तापुरभावीची रहिवासी असून तिचे नाव प्रियदर्शिनी लिंगराज पाटील (वय वर्षे ४५) असे समजते. दोनच दिवसापूर्वी ती महिला ऑस्ट्रेलियातून परतल्याची माहिती मिळाली आहे. मुलगा आजारी असल्याने ही महिला मानसिक चिंतेने ग्रस्त होती. हा त्रास सहन न झाल्याने तिने नदीत उडी टाकून आत्महत्या केल्याची तक्रार नमूद करण्यात आली आहे. सौंदत्ती पोलीस अधिक तपास करीत आहेत.