काँग्रेस नेते राहुल गांधी आज ईडी म्हणजेच सक्तवसुली संचलनालय दिल्ली येथे चौकशीसाठी हजर झाले. नॅशनल हेराल्ड प्रकरणी त्यांची चौकशी होणार आहे.
यावेळी प्रियंका गांधी-वड्राही त्यांच्या सोबत होत्या. यानंतर काँग्रेस प्रवक्ते रणदीप सिंग सुरजेवाला यांच्यासह इतर कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान, राहुल गांधी यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी काँग्रेसकडून देशभरात आंदोलन करण्यात येत आहे.