हॉस्पिटलचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांची पत्रकार परिषदेत माहिती
प्रतिनिधी / बेळगाव
कोल्हापूरहून येथील केएलई हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या रुग्णाचा ब्रेन डेड झाल्यानंतर एका 17 वषीय तरुणावर त्या व्यक्तीच्या हृदयाचे रोपण करण्यात आले. केएलईच्या डॉक्टरांनी ही शस्त्रक्रिया केली असून, हॉस्पिटलमध्ये झालेली ही दुसरी हृदयरोपण शस्त्रक्रिया आहे, अशी माहिती हॉस्पिटलचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांनी दिली.
सदर शस्त्रक्रियेबाबत माहिती देण्यासाठी मंगळवारी हॉस्पिटलमध्ये पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यांच्या समवेत हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. एम. व्ही. जाली, डॉ. रिचर्ड सालढाणा, डॉ. साधुण्णावर, डॉ. व्ही. ए. कोठीवाले व डॉ. नेर्ली उपस्थित होते.
डॉ. कोरे म्हणाले, हॉस्पिटलमध्ये हृदय रोपणाची गरज असणारे 20 रुग्ण होते. परंतु त्यांना हृदयदाता (डोनर) मिळू शकला नाही. त्यामुळे 13 जणांचा मृत्यू झाला. यामुळे अवयवदानाची मानसिकता रुजविण्याची गरज आहे. हॉस्पिटलमध्येच दाखल झालेल्या कोल्हापूरच्या एका रुग्णाचा ब्रेन डेड झाला. त्याच्या मृत्यूनंतर डॉ. कोठीवाले यांनी हृदयरोपणाबाबत त्याच्या कुटुंबीयांचे कौन्सिलिंग केले आणि त्यांना हृदयदानासाठी प्रवृत्त केले.
याच दरम्यान काकती येथील एक 17 वषीय युवक श्वास घेण्यास त्रास होत असल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल झाला. तो ऑक्सिजनवर होता. त्याला चालणे अशक्मय होते. डॉ. वीरेश मानवी यांनी त्याची तपासणी करून त्याचे हृदय नाजूक असल्याचे सांगितले. हॉस्पिटलचे प्रमुख हृदयरोगतज्ञ (सर्जन) डॉ. रिचर्ड सालढाणा यांनी हृदयरोपण हा एकच पर्याय असल्याचे सांगितले. कर्नाटक सरकारच्या अवयवदान प्राधिकारकडे ‘जीवन सार्थकता’ योजनेत त्याचे नाव नोंदविण्यात आले, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
डॉ. रिचर्ड सालढाणा म्हणाले, कोल्हापूरचे 52 वषीय रुग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. त्यांचा ब्रेन डेड झाला. तेव्हा डॉ. रविशंकर नायक व डॉ. अंबरीश नेर्लीकर यांनी ब्रेन डेड झाल्याचे अधिकृत जाहीर केले. 26 फेब्रुवारी 2021 रोजी सदर हृदयरोपणाची शस्त्रक्रिया सकाळी 11 ते 5 यावेळेत यशस्वीपणे पार पडली.
सदर शस्त्रक्रियेसाठी डॉ. सालढाणा यांना डॉ. मोहन गान, डॉ. किरण कुरकुरे, डॉ. रवी घटनट्टी, डॉ. रवी तंबर्लिमठ, डॉ. दर्शन डी. एस., डॉ. अभिषेक प्रभू, डॉ. निधी गोयल, भूलतज्ञ डॉ. आनंद वाघराळी, डॉ. शंकरगौडा पाटील, डॉ. अभिजित शितोळे, डॉ. जब्बार मोमीन, डॉ. चेतना, डॉ. पृथ्वी, डॉ. श्वेता, अवयवरोपण समन्वयक विनायक पुराणिक, प्रमोद सुळीकेरी, प्रमोद बुक्मयाळकर, तसेच साहाय्यक आनंद घोरपडे, किरण, अविनाश, सुनील, नियाज व मारिया यांचे सहकार्य लाभले.
आणि माझे स्वप्न पूर्ण होणार…
या पत्रकार परिषदेवेळी प्रवीण नायक यांनी आपले अनुभव कथन केले. मला सतत खोकला येत होता व जेवण जात नव्हते. मला पोलीस व्हायचे आहे पण प्रकृती साथ देत नव्हती. आता शस्त्रक्रियेनंतर मला बरे वाटत आहे. आणि माझे स्वप्न पूर्ण होणार आहे, असे प्रवीण यांनी हॉस्पिटलच्या बेडवरून थेट प्रक्षेपणाद्वारे माध्यमांशी संवाद साधला.
याच हॉस्पिटलमध्ये सर्वप्रथम ज्याच्यावर हृदयरोपण शस्त्रक्रिया झाली, त्या वीरभद्रप्पा पाटील यांनीही हृदयरोपणानंतर आपण पूर्णतः तंदुरुस्त असल्याचे सांगितले. डॉ. एम. व्ही. जाली यांनी सर्वांचे स्वागत केले. सदर शस्त्रक्रिया आरोग्य कर्नाटक व आयुषमान भारत योजनेंतर्गत झाल्याचे सांगितले. डॉ. वाघराळी यांनी आभार मानले.
महाराष्ट्राने दिले कर्नाटकला हृदय
कोल्हापूरच्या रुग्णाच्या हृदयाचे रोपण कर्नाटकातल्या आणि सीमाभागातील बेळगाव तालुक्मयातील रुग्णावर करण्यात आले. दोन्ही राज्यांमध्ये सीमेचे वाद सुरू आहेत. परंतु महाराष्ट्राच्या व्यक्तीचे हृदय कर्नाटकातील व्यक्तीला देण्यात आले आहे. हे एक सलोख्याचे उदाहरण आहे, असे डॉ. प्रभाकर कोरे यांनी सांगितले.