प्रतिनिधी / सातारा
सातारा येथील सोनगाव कचरा डेपोलगत नेचर इन निड या संस्थेत मेडिकल वेस्ट डी कंपोझ केले जाते. मात्र येथून रिसायकल करण्यासाठी वापरलेले पीपीई किट बाहेर घेऊन जाणारा ट्रक सामाजिक कार्यकर्ते जयदीप कांबळे यांनी अडवला. याची माहिती मिळताच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, सातारा तालुका पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. त्यामुळे आता हा चेंडू जिल्हाधिकारी यांच्या कोर्टात गेला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की सातारा पालिकेच्या सोनगाव कचरा डेपोलगत मेडिकल वेस्ट डिसपोज करणारी नेचर निड ही संस्था आहे. या संस्थेतून एक ट्रक बाहेर पडत असताना सामाजिक कार्यकर्ते जयवंत कांबळे यांनी अडवला. त्यांनी चालकास विचारणा केली असता व तपासणी केली असता ट्रकमध्ये वापरलेली पीपीई किट आढळुन आली.पीपीई किट बाबत विचारणा केली असता त्यास काही सांगता आले नाही. कांबळे यांनी पोलीस आणि आरोग्य विभागास याची माहिती दिली. चालकाकडे पावती मात्र तेथून ओंकार प्लॅस्टिककडे नेण्याची आढळून आली. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आठल्ये यांनी ही पाहणी केली. पोलिसांनी ही पाहणी केली आहे. दरम्यान, या पीपीई कीटचा नेमका घोटाळा काय आहे कोणावर कारवाई होणार हे जिल्हाधिकारी यांच्या कोर्टात चेंडू गेला आहे.
सातारा पालिकेच्या आरोग्य विभागाचे कानावर हात
सातारा पालिकेच्या आरोग्य विभागाने नेहमीच सावध भूमिका घेतल्याचे दिसत आहे. चक्क या प्रकरणाबाबत पत्रकारांनी आरोग्य विभाग प्रमुखाना विचारणा केली असता आरोग्य विभाग प्रमुखानी अगोदर कॅमेरा बंद करा, असे सांगत आमचा काही यात संबंध नाही, असे म्हणत कानावर हात ठेवत जबाबदारी झटकल्याचे पहायला मिळाले.