कामावरून सुट्टी मिळाल्यानंतर आपल्या गावी जात असताना उत्तर प्रदेशातील तुंडला रेल्वे स्थानकावर झालेल्या अपघातात निपाणी येथील रहिवासी असलेल्या लष्करी जवानाचा मृत्यू झाला.
राजेंद्र पांडुरंग कुंबार (४५) असे मृताचे नाव आहे. जवान राजेंद्र गेल्या २२ वर्षांपासून भारतीय लष्करात कार्यरत होते. गेल्या महिन्यात त्यांची उत्तर प्रदेशातील प्रयागराजला बदली झाली होती. रेल्वेत चढताना घसरून पडून त्यांचे निधन झाले. उद्या रविवारी दिनांक ११ डिसेंबर रोजी त्यांचे पार्थिव दिल्लीहून बेळगावला आणण्याची शक्यता आहे. जवानाच्या निधनाने गावात हळहळ व्यक्त होत आहे.