वायव्य कर्नाटक पथ परिवहन संस्थेने २५ वर्षांची वाटचाल यशस्वीरीत्या पूर्ण करून रौप्य महोत्सव पूर्ण करीत आहे. या अनुषंगाने सवलतीच्या दारात एक, दोन आणि तीन महिन्यांसाठी बसपास देण्यात येत आहे.
एक महिन्याच्या पासमध्ये २ दिवसाची वाढ करण्यात आले आहे. बीआरटीएस स्मार्ट कार्डधारकांना २ महिन्यांचे पास असेल तर त्यात ५ दिवस अधिक देण्यात येईल. तसेत तीन महिन्यांचे असेल तर अतिरिक्त १० दिवस देण्यात येणार आहे. याआधीच पास घेतलेल्यांना ४०% सवलतीसह एक महिन्याचे पास घेतलेल्यांना २० दिवस, दोन महिन्यांसाठी ६५ दिवस आणि ३ महिन्यांसाठी १०० दिवस प्रवास करण्याची संधी देण्यात आली आहे.