बेळगाव :
बेंगळूरस्थित रश्मी सोनी यांच्या Shiny colours तर्फे आयोजित राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आलेल्या ऑनलाईन चित्रकला स्पर्धेत बेळगावच्या चंद्रशेखर रांगणेकर यांच्या व्यक्तीचित्रास प्रथम पारितोषिक मिळाले. कर्नाटक चित्रकला परिषद, बेंगळूर येथे पुरस्कार वितरण सोहळ्यात रु. 20,000 रोख, भेटवस्तू आणि प्रमाणपत्र देऊन रांगणेकर यांना गौरविण्यात आले. या स्पर्धेत विविध राज्यांतून सुमारे 450 चित्रकारांनी भाग घेतला होता.