नव्या ठिकाणी हिंडणे अधिक उत्तम
अनोळख्या ठिकाणी गेल्यावर मनाला आनंद देणारी किंवा चकित करणाऱ्या गोष्टींपासून मिळणारा आनंद नर्वस सिस्टीमला शांत करतो. बर्कले येथील कॅलिफोर्नियात युनिव्हर्सिटीतील मानसशास्त्राचे प्राध्यापक डेचर केल्टनर यांच्यानुसार अशाप्रकारच्या वॉकला ‘ऑ वॉक’ म्हटले जाते. ‘ऑ वॉक’ करणाऱ्या लोकांमध्ये अधिक उत्साह असतो. ते अधिक सकारात्मक असतात, त्यांच्यात सहकार्य करण्याची भावना वाढत असल्याचे केल्टनर यांचे म्हणणे आहे.
नव्या ठिकाणांची निवड करा
अशा ठिकाणांची निवड करा, जेथे तुम्ही यापूर्वी कधीच गेला नसाल. उदाहरणार्थ नजीकचे उद्यान किंवा गल्ली जेथे तुम्ही कधीच गेला नसाल. तलाव, सरोवर किंवा एखाद्या जलाशयाची निवड करू शकता. ही ठिकाणं तुमच्या नजीक आसपास उपलब्ध नसल्यास अशा ठिकाणांची निवड करा, जेथे तुम्ही दीर्घकाळापासून गेला नसाल. अशा ठिकाणांना नव्याने एक्स्प्लोर करण्याचा प्रयत्न करा. त्या ठिकाणी पहिल्यांदाच आल्यासारखी भावना मनात निर्माण करा. तेथे पोहोचल्यावर स्वत:ला कुठल्याही व्यत्ययाशिवाय कमीतकमी 20 मिनिटे द्या. शक्य झाल्यास मोबाइल बंद करून ठेवा. दीर्घ श्वास घेत रहा असे तज्ञांकडून सांगण्यात आले.
ठिकाणाचे निरीक्षण कर
तुम्हाला आश्चर्यकारक अन् चकित करणाऱ्या ठिकाणांचे, आवाजांचे अन् गंधाचे निरीक्षण केले जावे. अशी संधी मिळाल्यास त्याचा लाभ घेतला जावा. चेहऱ्याला स्पर्श करून जाणाऱ्या वाऱ्याची अनुभूती घ्या. कुठल्याही फुलाच्या पाकळ्यांना स्पर्श करा, आसपासच्या किटक अन् पतंगांचा आवाज ऐकला जावा.
छोटी सुरुवात करा
जेव्हा कधी बाहेर जाल, तेव्हा थांबून अनोळखी किंवा नव्या गोष्टी जाणून घेण्याची सवय लावून घेतली जावी. जर तुम्ही एखाद्या गर्दीत असाल तर एका व्यक्तीवर लक्ष केंद्रीत केल्यावर हळूहळू पूर्ण गर्दीवर नजर टाका. जमावाच्या स्वरुपात जमा लोक कुठल्या प्रकारच्या हालचाली करत आहेत हे समजून घेण्याचा प्रयत्न केला जावा. जेव्हा घरातून बाहेर पडाल तेव्हा आसपासच्या गोष्टींचे निरीक्षण करण्याचा निश्चय करा अशा सूचना तज्ञांनी केल्या आहेत.