बेळगाव प्रतिनिधी – आनंद घेण्यासाठी कला हवी, एका कलाकृतीतून अन्य कलांचा प्रभाव ही प्रतीत व्हायला हवा. इतक्या ताकदीने ती कलाकृती साकारायला हवी असे मत ज्येष्ठ चित्रकार काशिनाथ हिरेमठ यांनी व्यक्त केले. वरेकर नाट्य संघाच्या के. बी. कुलकर्णी कलादालनामध्ये गुलमोहर बाग तर्फे मोसम या विषयावर बागच्या चित्रकारांच्या चित्रांचे प्रदर्शन भरवले आहे. त्याचे उद्घाटन केल्यानंतर हिरेमठ बोलत होते प्रमुख पाहुणे म्हणून संघाचे कार्याध्यक्ष किरण ठाकूर उपस्थित होते.
व्यासपीठावर कार्यवाह शिरीष देशपांडे व सचिन उपाध्ये उपस्थित होते. रोपाला पाणी घालून प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. हिरेमठ यांनी सर्व चित्रकारांना शुभेच्छा दिल्या, यावेळी बोलताना किरण ठाकूर म्हणाले विविध कलाकृतीतून माणसांच्या जीवनामध्ये आनंद येतो निसर्गा इतका उत्कृष्ट चित्रकार कोणीही नाही. सूर्योदय आणि सूर्यास्ताला साकारणारे आकाशातील चित्र संगती पाहून आपल्याला याचा प्रत्यय येतो. कलेचे सामर्थ्य मोठे आहे. मात्र समान कलासक्त वृत्तीच्या लोकांनी एकत्र यायला हवे. त्यातून कला विकसित होईलच परंतु त्यापुढे जाऊन त्याचे व्यावसायिकरण कसे होईल व अर्थार्जनासाठी ते कसे पूरक ठरेल हे सुद्धा पाहायला हवे. चित्र प्रदर्शने फक्त चित्रकारांपुरतीच मर्यादित न ठेवता शालेय विद्यार्थी या प्रदर्शनाकडे कसे वळतील याची जबाबदारी घेण्याचे आवाहन ही किरण ठाकूर यांनी केले. प्रारंभी शोभा कुलकर्णी व सुषमा पाटणेकर यांनी पाहुण्यांना रोप देऊन त्यांचा सत्कार केला. सूत्रसंचालन वृषाली मराठे यांनी केले शिरीष देशपांडे यांनी आभार मानले.
Previous Articleमविआ सरकार पाडण्यासाठी प्रयत्न केले; चंद्रकांत पाटलांची कबुली
Related Posts
Add A Comment