प्रतिनिधी / बेळगाव : काकतीमध्ये शाळेमध्ये झेंडावंदन करून घरी परत येत असताना बारा वर्षाच्या लक्ष्मी रामाप्पा नाईक या लहान मुलीवर अचानक दहा ते बारा भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. यात लक्ष्मीला गंभीर जखमी केले. लक्ष्मीला फरफटत नेत असताना तिथूनच जाणाऱ्या संजू धोनजी या युवकाने धाडसाने त्या लहान मुलीची त्या कुत्र्यांपासून सुटका केली.
काकतीमध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या खूपच वाढली आहे. समाजसेवकांनी व गावकऱ्यांनी याविषयी पंचायतला निवेदन दिले आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. कारण यापूर्वी अशी दोन-तीन प्रकरणे झालेली आहेत. त्या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी विनंती नागरिकांतून होत आहे.