कुरळप प्रतिनिधी
वाळवा तालुक्यातील ऐतवडे बुद्रुक येथील आप्पासो नेमगोंडा पाटील -शिरोटे यांच्या विहिरीत रात्रीच्या सुमारास बिबट्या भक्ष्याच्या शोधात पडला. शुक्रवारी सकाळी पाटील हे विहिरीवरील मोटर चालू करण्यासाठी गेले असता त्यांना बिबट्या विहिरीत पडल्याचे दिसून आले. संबंधित शेतकऱ्याने वनविभागाला कळवले असता,वनविभागाचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पिंजऱ्या सह दाखल झाले.यामध्ये रेंजर भगले, भगवान गायकवाड, निवास ऊगळे ,अनिल पाटील,भिवा कोळेकर अश्विनी वाघमारे,यांच्यासह वन विभागाच्या कर्मचाऱ्यांचा समावेश होता.कुरळप पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी ही उपस्थित होते. दरम्यान बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.बिबट्याला विहिरीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत.